Ad will apear here
Next
‘आकांक्षां’पुढती जिथे गगन ठेंगणे!
आकांक्षा प्रभुणेही गोष्ट आहे आकांक्षा प्रभुणे या एका मराठी मुलीची. चित्रपट क्षेत्राची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसूनही या क्षेत्रातच करिअर करण्याची आकांक्षा तिने जिद्दीने पूर्ण केली. अमेरिकेत या क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेऊन तिथे तिने फिल्ममेकर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आहे. ‘रिझॉल्व्ह’ या तिच्या शॉर्टफिल्मची रोमच्या प्रिझ्मा इंडिपेंडंट फिल्म अॅवॉर्ड फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. इतरही अनेक प्रोजेक्ट्सवर ती काम करते आहे. तिच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल...
.............
जिद्द, नवनवे शिकण्याची वृत्ती आणि एखाद्या ध्येयासाठी कष्ट घेण्याची तयारी हे गुण जर व्यक्तिमत्त्वात असतील, तर गगन ठेंगणे करण्याएवढे कर्तृत्व गाजवता येते. त्यात कुटुंबाचे आणि मित्र-मैत्रिणींचे उत्तम पाठबळ असेल, तर अगदी वेगळ्या क्षेत्रातही चांगले यश संपादन करण्याचा मार्ग आणखी सुकर होतो. पुण्यातील आकांक्षा सचिन प्रभुणे हिची गोष्ट वाचल्यावर तुम्हालाही हे नक्की पटेल. 

पत्रकारिता, टेलिव्हिजन किंवा सिनेमा क्षेत्रात कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कार्यरत नसतानाही आपण फिल्ममेकरच व्हायचे, असे ध्येय आकांक्षाने ठेवले होते. माहिती-तंत्रज्ञान विषयात पदवी घेतल्यानंतर २०१५मध्ये आकांक्षाने अमेरिकेतील लॉस एंजलीसमधील कॅलिफोर्निया स्टेट युर्निव्हर्सिटीत ‘मास्टर आफ फाइन आर्टस् इन टेलिव्हिजन, फिल्म अँड थिएटर’ या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

‘या क्षेत्रात माझ्या परिचयाचे असे कोणीच नव्हते. तसेच मला या क्षेत्राची कौटुंबिक पार्श्वभूमीदेखील नाही. त्यामुळे अगदी शून्यापासून सुरुवात करावी लागली. परदेशात राहून एका नव्या आणि अनोळखी क्षेत्राचा अभ्यास करणे आणि त्यातूनच करिअरला आकार देणे या गोष्टी मला पहिल्यांदा खूपच अवघड गेल्या. परंतु सर्व अडचणींना मी धैर्याने तोंड दिले आणि यशस्वी ठरले,’ असे आकांक्षा सांगते.

अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आकांक्षाने प्रथम सायन्स फिक्शनवरील शॉर्टफिल्मचे लेखन केले. तिथूनच तिचा खरा प्रवास सुरू झाला. स्थलांतरित आईच्या मृत्यूची वेदना आणि त्यासाठी तिच्या मुलीने घेतला सूड असा आशय असलेल्या ‘रिझॉल्व्ह’ या शॉर्टफिल्मची तिने निर्मिती केली. त्यानंतर ‘सोशल अँक्झायटी’ हा मनोविकार असलेल्या स्त्रीचे चित्रण करणाऱ्या ‘गोइंग आउट’ या शॉर्टफिल्मची तिने निर्मिती केली. या फिल्मचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, ती फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठवली जाणार आहे. याचबरोबर ‘दी इनफिलटॅटर्स’ या चित्रपटाच्या टीममध्येही ती सहभागी झाली होती. या सिनेमाला यंदाच्या सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. लॉस एंजलीस लॅटिनो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि मायामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले. अॅशलँड इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील या चित्रपटाला पुरस्काराने गौरविण्यात आले. एप्रिल २०१९मध्ये झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एंजलीस (आयएफएफएलए) या उपक्रमाच्या प्रोडक्शन टीममध्येही आकांक्षाचा सहभाग होता.

‘सप्टेंबर २०१८ ते मे २०१९ हा कालावधी माझ्यासाठी खूपच खास होता. या कालावधीत नॅशनल जिओग्राफिक वाइल्ड या चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या ‘हवी मँडेल्स अॅनिमल्स डुइंग थिंग्ज – सीझन टू’ या कॉमेडी शोसाठी सहनिर्माती म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. प्रख्यात विनोदी अभिनेते हवी मँडेल या शोचे कार्यकारी निर्माते होते. त्यानंतर ऑक्सिजन टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘ए वेडिंग अँड ए मर्डर’ या क्राइम शोसाठीही मी सहनिर्माती म्हणून काम केले. हादेखील माझ्यासाठी वेगळा अनुभव होता,’ असे आकांक्षा सांगते. यंदाच्या स्मार्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये फायनलिस्ट ठरलेल्या ‘राइट’ या चित्रपटाची निर्मितीदेखील आकांक्षाने केली आहे.

हे सर्व काम सुरू असताना ‘रिझॉल्व्ह’ या शॉर्टफिल्मने आकांक्षाला यशाची दारे खऱ्या अर्थाने उघडून दिली. या शॉर्टफिल्मचे २०१८मध्ये दिल्ली शॉर्टफिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये, तर २०१९मध्ये ओअॅसिस फिल्म स्क्रीनिंग सीरिज, इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल, अनरिस्ट्रिक्टेड व्ह्यू फिल्म फेस्टिव्हल, बेस्ट शॉर्टस् कॉम्पिटिशन, अॅकोलेड ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल, व्हेगस मूव्ही अॅवॉर्डस्, प्रिझ्मा इंडिपेंडंट फिल्म अॅवॉर्डस् इन रोम या सगळ्या फेस्टिव्हलमध्ये स्क्रीनिंगसाठी अधिकृत निवड झाली आहे. याव्यतिरिक्त लॉस एंजलीसमधील रिगल एलए लाइव्ह या प्रख्यात थिएटरमध्ये या शॉर्टफिल्मचा प्रीमिअर झाला. एप्रिलमध्ये लंडनमधील ‘हेन अँड चिकन’ थिएटरमध्ये या फिल्मचे स्क्रीनिंग झाले. 

‘या निमित्ताने मला विविध फिल्म फेस्टिव्हल्सना उपस्थित राहण्याची, तसेच प्रख्यात फिल्ममेकर्सशी संवाद साधण्याची आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी आत्मसात करण्याची संधी मिळाली,’ असे आकांक्षाने सांगितले. अमेरिकेतील टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीतील भारतीय वंशाचे अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शकांच्या मुलाखतींवर आधारित संहितेवर निर्माती म्हणूनही आकांक्षा काम करतेय. ही मालिका यू-ट्यूबवर प्रसारित होणार आहे. तसेच अमेरिकेतील शहरांमधील पर्यटनावर आधारित असलेल्या एका शोची निर्मितीदेखील ती करते आहे.

‘भविष्यात मला सर्वच शैलींवर (जॉनर्स) लेखक आणि निर्माती म्हणून काम करायचे आहे. तसेच हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्येदेखील काम करण्याची माझी इच्छा आहे. कोणताही प्रोजेक्ट सुरू करताना मी सर्वाधिक प्राधान्य संहितेला (स्क्रिप्ट) देते. त्यामुळेच उत्तम कलाकृती तयार होते, असे मला वाटते,’ असे आकांक्षाने सांगितले.

‘फिल्म इंडस्ट्रीत येताना तुम्हाला अनेक जण सांगतात, की या क्षेत्रातील माणसे आणि संस्कृती चांगली नसते; पण मला आलेला अनुभव अत्यंत सुखद आहे. मी अनेक कलाकार, तंत्रज्ञांबरोबर काम केले आहे. आपले काम आणि वैयक्तिक आयुष्य यांतील समतोल उत्तम पद्धतीने सांभाळणारी आणि मार्गदर्शन करणारी माणसे मला अमेरिकेत भेटली. त्यामुळेच या क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही मी यश मिळवू शकले,’ असे आकांक्षा आवर्जून नमूद करते.

तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

-  गायत्री भालेराव, पुणे
ई-मेल : gayatri.bhalerao242@gmail.com

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZUKCD
 Good work Akanksha! All the best for a bright future!4
 Well done Akansha.... So proud of you.... Gud luck4
 फारच छान, अभिमान वाटतो आम्हाला Very nice, proud of you Akanksha👍👍👍3
 Akanksha great. Good job done. All the best for your future.3
 Well done Akanksa3
 Congrats Aakanksha Prabhune!

Great news!!!....3
 Congratulations Akanksha...very proud of you4
 Great ......!!! Congrats Akanksha
All the Best for your Bright future
Bhagyashri,Vijay,Tejas2
 Well Done Akanksha Best Wishes for Bright & Prosperous future It is because of hard work Well Presentation by Gayatri Bhalerao4
 Very well done..Akanksha ..wish you best wishes..for bright future..3
 Wow ! Akanksha, nice to know about your new and successful venture. Hearty congratulations......Soar high !!4
 Congratulations Akanksha!! Sky is the limit... All the best for you future endeavors.3
 Too good......Hearty congrats....Best wishes for future.....3
 Amazing! Proud of you!! ❤️keep up the good work!!! 😁4
 Well done ! All the very best for future projects !3
 Well done Aakanksha. Wishing you a very bright future .4
 STRENGTH, COMMITMENT, CHALLENGES & CONFIDENCE
Build a Ladder up to Destination Called "Success". Congratulations Akanksha👍5
 Very Nice Akanksha! Proud to see you passionately following your career aspirations! Keep it up!2
 Congratulations Akanksha ! All the best for your career !3
 Congratulations Aakanksha!!! Truly amazing.All the best for your future endeavours...3
 We are proud of you. ALL THE best3
 Very nice Akanksha!! Congrats and Proud moment for Parents!!!3
 Excellent achievement Akanksha. Very proud that Marathi Brahmin daughter of my friend and my doctor who had no background of this career has achieved so much. Our best wishes for your career.3
 G8, Akansha well done, proud of you being a sibling from my native Satara and of course from Pune,a girl of my Family Doctot. Wish you all the Success, God Bless You.3
 Wow .. very well done.. congrats to Akanksha and her proud parents.2
 Indeed a great achievement and proud feeling. Keep up the good work and have bright future ahead!!2
 Congratulations Aakanksha.2
 Proud of you Akanksha.Keep it up👍2
 Congratulations on your success. Wish you several more as you go along the way.2
 Akansha is true example of what committment and dedication can achieve in life. She is passionate about reading, writing and creativity. followed MS in computers and could have enjoyed comfortable IT but she took a challenge by chosing unknown career line and has proved herself in totally new country. Definitely she will become known name in ineternational film & media industry4
 Unbelievable capacity and eagerness to do new things has helped her reach such stage.
Make the best of your opportunity and keep doing things which others could follow2
 Good work. ..Akanksha... congratulations and best wishes for future..

And special thanks to
Miss. Gayatri Bhalerao ..... very well summarised ... because of you, we could know such young talent...6
 Awesome work Akanksha. Keep doing such things and one day you will make your Family and us Proud :)2
 Heartiest congratulations Akankasha!!..way to go girl!!..what an inspiring journey it has been..All the very best for your future!!3
 This is really great!! Congratulations!!! Very well done!! All the best! Keep up the good work!2
 In spite of having a degree in IT engineering, instead of going for a lucrative IT job Aakanksha has chosen a career of her passion. With her hard work and perseverance she has already shown her " resolve " to carve her name in this field. Congratulations and keep it up!!5
 You have done amazing work! You have proved yourself and made us proud! Keep up the good work and best of luck for your bright future! मला आता अजिबात काळजी वाटत नाही!! -आजोबा4
 Great work!! Congratulations and best of luck for the future :)3
 Hey Akanksha! Keep up with your good work, proud of you :) Congratulations and all the best for your future! :D3
 Akanksha really great achievement. Right from admission for studies at USA you did everything on your own with your own study/contacts and achieved remarkably in area in which you are interested!! I am sure that you will reach great heights and achieve desired goal in your career. Congrats and keep it up!!1
Similar Posts
‘श्री ठाणेदार हे व्यावहारिक जगतातील टारझन’ पुणे : ‘बेळगावहून अमेरिकेत जाऊन एक यशस्वी उद्योजक बनलेले आणि मंदीच्या काळात कंपनी, घर आणि किमती मोटार विकून पूर्णपणे झिरो झालेले आणि आपल्या कतृत्वाने पुन्हा एकदा गगनभरारी घेणारे श्री ठाणेदार हे व्यावहारिक जगतातील टारझन आहेत,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी काढले
तिहेरी शर्यतींचा ‘कौस्तुभ’मणी - ‘आयर्नमॅन’ डॉ. कौस्तुभ राडकर ‘ट्रायथलॉन’ म्हणजे जलतरण, सायकल चालवणे आणि धावणे अशा तीन क्रीडाप्रकारांचा समावेश असलेली शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचा कस पाहणारी स्पर्धा. एकाच दिवसात ठरावीक वेळेत ती पूर्ण करणाऱ्याला ‘आयर्नमॅन’ हा किताब मिळतो. पाश्चात्य देशांत प्रचलित असलेल्या या स्पर्धा तब्बल २५ वेळा पूर्ण केलेले डॉ. कौस्तुभ राडकर हे एकमेव भारतीय आहेत
ये हौसला कैसे झुके, ये आरजू कैसे रुके... रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरप्यासारख्या लहानशा गावातून एक मुलगा पुण्यात पोहोचला आणि नंतर त्याच्या स्वप्नांनी त्याला थेट अमेरिकेत नेऊन पोहोचवलं. अमेरिकेत जाऊनही त्यानं आपलं मूळ गाव साखरपा आणि पुणे यांच्याशी असलेली नाळ तोडली नाही. या तरुणाचं नाव आहे मंदार मोरेश्वर जोगळेकर! ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या
मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल्स महाराष्ट्राला दिवाळी अंकांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. मराठी माणूस जगभरात कोठेही गेला, तरी त्याला महाराष्ट्रातील सणसमारंभांची आठवण स्वस्थ बसू देत नाही. मग दिवाळी अंक तरी त्याला अपवाद कसे असणार? परदेशस्थ अनेक साहित्यप्रेमी मराठी माणसे ई-दिवाळी अंक प्रसिद्ध करतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल्स’ हा अंक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language